Mumbai Crime : प्रेमप्रकरण, अनैतिक संबध यातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळतय. असाच काहीसा प्रकार डोंबिवलीत ( Dombivali ) घडलाय. प्रेम संबंधातून झालेल्या वादावादीतून प्रेयसीचा प्रियकराने निर्घुण खून केलाय. डोबिंवलीच्या मानपाडा परिसरात ही विवाहित प्रेयसी राहत होती. हत्येनंतर आरोपीने स्वतःच पोलीस ठाणे गाठत आपण खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी आरोपीवर कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील चौकशी सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारु पिऊन प्रेयसीच्या घरात शिरला


मानपाडा हद्दीतील पाईपलाईन परिसरात एका चाळीच्या रूम नंबर 9 मध्ये 42 विवाहित प्रेयसी राहत होती. महिलेच्या शेजारीच तिचा 33 वर्षीय प्रियकर राहत होता. दोघांमध्ये असलेल्या प्रेमसंबधातून त्यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. बुधवारी सकाळी प्रियकर दारू पिऊन थेट प्रेयसीच्या घरात शिरला. यादरम्यान त्याने प्रेयसीकडे पैसे मागितले. मात्र प्रेयसीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये मोठा वाद झाला. यादरम्यान, संतापलेल्या प्रियकराने महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार केले.


हत्येची दिली कबुली


या हल्लात महिलेचा जागीच मृत्यू झालाय. हत्येनंतर पश्चाताप झाल्याचे म्हणत आरोपीने मानपाडा पोलीस ठाणे गाठलं आणि आपण शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली. आरोपीचेही लग्न झाले नसून तो वृद्ध आई वडिलांसोबत राहत होता. हत्या झालेल्या महिलेचा पतीदेखील खाजगी कंपनीत नोकरी करतो तर मुलगा ट्रॅफिक वार्डन आहे. दरम्यान, मानपाडा पोलीस ठाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.