मुंबई : १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसाला काल मध्यरात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं. जे जे हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोसाला हाय ब्लडप्रेशर आणि मधुमेहाचाही त्रास आहे. याशिवाय डोसानं हृदयरोगासंदर्भात विशेष न्यायालयालाही सूचना देऊन बायपास सर्जरी करण्याची परवानगी मागितली होती.   


१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी डोसा दोषी असल्याचं सिद्ध झालंय. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मध्यरात्री डोसाला जेजेमध्ये दाखल केल्यावर तिथला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 


बॉम्बस्फोटाचा दुबईत कट रचणे, कटासाठी माणसांची जुळवा जुळव करुन त्यांना ट्रेनिंगकरता पाकिस्तानात पाठवणे,  लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, खुन, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे मुस्तफा डोसावर दाखल करण्यात आलेले आहेत.