नालासोपारा स्फोटकं प्रकरणातील आरोपींची न्यायालयासमोर पुन्हा हजेरी
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊतसह सर्व नऊ आरोपींशी सनातन संस्थेचा संबंध नसल्याचा दावा सनातनच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय
मुंबई: नालासोपारा स्फोटकं प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर यांची पोलीस कोठडी संपलीय. या चौघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
सनातनचा दावा
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊतसह सर्व नऊ आरोपींशी सनातन संस्थेचा संबंध नसल्याचा दावा सनातनच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सनातननं खुलासा केलाय.
आरोपपत्रात सनातनचा उल्लेख नाही
आरोपपत्रात सनातनचा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे सनातनवर बंदी घालण्याची मागणी तथ्यहीन असल्याचा दावा सनातननं केलाय. तसंच अंनिसचे कार्यकर्ते नाव गोवून सनातनला बदनाम करत असल्याचा आरोप सनानतन संस्थेनं केलाय.