केळवे चौपाटीवर नालासोपाऱ्यातील ४ जण बुडालेत
काही तरुण पालघर जिल्ह्यातील केळवे चौपाटीवर रविवार सुटीनिमित्त फिरायला गेले होते. त्यातील ४ जण बुडालेत.
मुंबई : नालासोपारा येथील काही तरुण पालघर जिल्ह्यातील केळवे चौपाटीवर रविवार सुटीनिमित्त फिरायला गेले होते. त्यातच आज सकाळपासून पाऊस कोसळत आहेत. पावसात भिजण्याचा आनंद लुटत काहीजण समुद्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न समजल्याने ४ जण बुडालेत. यातील तीन जण बेपत्ता आहेत. दरम्यान, एकाचा मृतदेह सापडला आहे.
ही सर्व महाविद्यालयीन मुले होते. भरतीची वेळ होती त्यावेळी समुद्रात उतरलेल्या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. दरम्यान, या ठिकाणी दुर्घटना घडत असताना जीवरक्षक नेमण्यात येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.