काळाघोडा चौकाचं नाव बदलणार?
काळाघोडा चौकाला इस्त्रायलचे माजी पंतप्रधान शिमोन पेरीज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव गटनेता बैठकीत वादग्रस्त ठरला.
मुंबई : काळाघोडा चौकाला इस्त्रायलचे माजी पंतप्रधान शिमोन पेरीज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव गटनेता बैठकीत वादग्रस्त ठरला.
एकीकडे मुंबईत ब्रिटीशांनी दिलेली इंग्रजी नावे बदलण्याचा सपाटा लावलाय आणि दुसरीकडे मात्र मुंबईसाठी कोणतेही योगदान नसलेल्या इस्त्रायली पंतप्रधानाचे नाव देण्याचा घाट घातला, असा सवाल यावेळी विचारण्यात आला.
प्रशासन आता दिल्लीच्या आदेशावरुन प्रस्ताव आणणार का असा प्रश्न समाजवादी पार्टीचे गट नेते गट नेते रईस शेख यांनी उपस्थित केला.
काळाघोडा चौकाचं शिमोन पेरीज असं नामकरण होऊ नये म्हणून स.पा. नं ठोस भूमीका घेतली. त्यामुळे हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला.