नाना पटोले यांचे हनुमान चालीसा वरून मोठं विधान, म्हणाले...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या हनुमान चालीसा भूमिकेवरून नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलंय.
मुंबई : राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे हटविले नाही तर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्याचे परिणाम राज्यातच नव्हे तर देशातही दिसून आले. हनुमान जयंतीला राज्यातच नव्हे देशभरात ठिकठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमचा कोणत्या धर्माला विरोध नाही. पण, कोणी त्याचा बाऊ करू नये. आम्ही सर्वधर्म समभाव पाळतो असं म्हटलंय.
महाराष्ट्रात एकात्मता भाईचारा संपविण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी ही काँग्रेसची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे केवळ कॉमेंट्री करत आहेत. महागाईवरून जनतेचे लक्ष बाजूला करण्यासाठी भोंगे, मस्जिद असे विषय काढले जात आहेत.
हनुमान चालीसा वाचणं काही वाईट नाही, मी ही सकाळी घरातून बाहेर पडताना हनुमान चालीसा वाचूनच बाहेर पडतो. पण, त्याचा बाऊ करत नाही, असे नाना
पटोले म्हणाले.