मुंबई : राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र, किंवा कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. कारण एकमेकांवर काँग्रेसमध्ये असताना टीका करणारे, नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांनी एकमेकांना समोरासमोर आल्यानंतर नमस्कार केला.


एकेकाळी काँग्रेसवासी होते नारायण राणे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना एकेकाळी काँग्रेसवासी असलेले नारायण राणे, काँग्रेस आताच्या नेत्यांसमोर आले. नारायण राणेंनी भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला, तेव्हा अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसकडून राज्यसभेचे उमेदवार कुमार केतकरही उपस्थित होते.


कुमार केतकरांचा अर्ज भरण्यासाठी चव्हाण हजर


अर्ज भरल्यावर नारायण राणेंनी पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, कुमार केतकर या सगळ्यांना हस्तांदोलन केलं. अशोक चव्हाण आणि नारायण राणेंनी एकमेकांना नमस्कार केला.