मंत्रिमंडळात नारायण राणे यांना मिळणार ‘हे’ खातं?
दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात नारायण राणे यांना संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारात नारायण राणे यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई : दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात नारायण राणे यांना संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारात नारायण राणे यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर आता नारायण राणे यांना सार्वजनिक बांधकाम खाते दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनुभव आणि ज्येष्ठता याला योग्य असे खाते आपल्याला मिळावे, अशी राणे यांची अपेक्षा आहे आणि त्याचा विचार करून राज्य मंत्रिमंडळात त्यांना योग्य असे स्थान दिले जाईल, असे स्पष्ट करत राणेंकडे महत्त्वाचे खाते देण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्यावतीने आज दिवाळीनिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राणेंबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
दरम्यान, राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. घटक पक्ष म्हणून एनडीएत स्थान मिळवलं. नारायण राणे यांना सार्वजनिक बांधकाम खाते दिले जाण्याची शक्यता राज्य सरकारमधील सूत्रांनी व्यक्त केली. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे खाते आहे.