कणकवली : भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांच्याविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी नक्कल केली, त्याविषयी भास्कर जाधव यांना योग्य वेळी उत्तर देणार, असं नारायण राणे यांनी आज कणकवलीत पत्रकारांशी बोलताना केलं. तर नाचे आहेत, ते पैसे देऊन नाचतात ,असं भास्कर जाधव यांचं नाव न घेता नारायण राणे यांनी वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कणकवलीच्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्या बोलण्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे आले, यात कोण अजित पवार मी ओळखत नाही, आमच्याकडे पूर आला उपमुख्यमंत्री आले कुठे? असा सवालही यावेळी नारायण राणे यांनी केला.


आमच्यासमोर कुणाची उभं राहण्याची हिंमत नाही, माझ्याविरोधात कुणी कटकारस्थान केलं तर माझी बढतीच होते, कायदेशीर कारवाई करण्यासाठी लोकशाहीत अनेक माध्यमं आहेत, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.



विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले, ३ पक्षाचे ३ विधानसभा अध्यक्ष करा, तेव्हाच प्रश्न मिटेल, असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.


वाघाची मांजर कधी झाली, असा सवाल देखील नारायण राणे यांनी केला, तर एवढा पोलीस फाटा कणकवलीत येण्यामागे काय घडलं? असा सवालही नारायण राणे यांनी केला आहे.