मुंबई : आझाद मैदानावर नाणार प्रकल्प विरोधांनी मोर्चा काढला असून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नारायण राणे यांनी भेट घेतली. यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, असे ते म्हणाले. 


शिवसेनेवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नाणार प्रकल्पाबाबत डबल गेम खेळतेय. नाणार प्रकल्पाला मंजूरी देणारेही तेच आणि विरोध करणारेही तेच आहेत. 


सेनेने माझी काळजी करु नये


मी माझ्या पक्षाचं काय करणार ते येत्या ८ दिवसांत कळेल. मी बघतो काय करायचं ते...शिवसेनेला काळजी करण्याची गरज नाही. नाणारच्या बाबत मुख्यमंत्री माझं ऐकतात की शिवसेनेचं ऐकतात की नाही ते तुम्हीच बघा...राज्यसभेवर जाण्याबाबत मी विधानसभेच्या आवारात बोलतोय...


राणेंच्या राज्यसभेवर सेनेचा आक्षेप


नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी उमेवारी अर्ज भरला आहे. पण आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपकडून देण्यात आलेल्या नारायण राणे यांच्या राज्यसभा उमेदवारीबद्दल शिवसेनेने घेतला आक्षेप घेतला आहे. राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार ? राणेंनी ते अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र् स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे का ? भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याची पावती राणे यांच्याकडे आहे का ? राणे यांना सदस्यत्व दिले नसेल तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी कशी दिली ?, असे प्रश्न शिवसेना विधान परिषद गटनेते ऍड. अनिल परब यांनी विचारले आहेत.