मुंबई : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपासावरुन, ज्याप्रकारे हे प्रकरण हाताळलं जात आहे त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी त्यांना धारेवर धरलं होतं. यावरुन वरुण सरदेसाई तू  लहान आहेस, अन्यथा तोंड बंद करण्याचे उत्तर आहे आमच्याकडे, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी वरुण सरदेसाईंनी माफी मागावी असं म्हटलं आहे. मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. 


Sushant Singh Rajput Case : ... मग सोडून द्या सुरक्षा कवच; अमृता फडणवीसांना टोला


 


 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी असेपर्यंत वरुण सरदेसाई नव्हता, आता तो आलाय. कुणाचा नातलग आहे ते माहिती आहे. पोलीस स्वत:हून मोठ्या लोकांना संरक्षण देतात. चमचेगिरी करु नका, त्यांच्याही कुंडल्याही काढू. वरुण सरदेसाई लहान आहेस तू, त्यांनी माफी मागावी, अन्यथा तोंड बंद करण्याचे उत्तर आहे आमच्याकडे' असं म्हणत नारायण राणेंनी मिसेस फडणवीसांची पाठराखण केली आहे.


उद्धव ठाकरे आठ बाय आठच्या खोलीत बसून महाराष्ट्राचा कारभार चालवतायत- राणे


अमृता फडणवीस ट्विट करत नेमकं काय म्हणाल्या होत्या? 


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं जात आहे, ते पाहता मला असं वाटतं की मुंबईने माणुसकीच गमावली आहे. इथं निरपराधांना राहणं आता सुरक्षित नाही, असं म्हणत मुंबईमध्ये पोलिसांकडून या प्रकरणी, ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात येत आहे त्या बाबतीत मिसेस फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या याच ट्विटवर वरुण सरदेसाई यांनी उत्तर देत भरवसा नसल्यास, सुरक्षा कवच सोडून द्या असं म्हणत टीका केली.