मुंबई : 'सरकार पाडायचं काय, ते पडतच आलंय', असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य चालवताय तर मग उत्पन्न वाढवा.  नैसर्गिक आपत्तीत केंद्रानं मदत द्यायलाच हवी, असं देखील काही नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काल जीएसटीचा निर्णय चुकला असं म्हटलं. त्यावर राणे म्हणाले की,' जीएसटी देणार, उशीर होईल पण देणार'.


सुशांत प्रकरणावर काय म्हणाले राणे 


 सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं पुरावे मागीतले तर देणार असं देखील नारायण राणे म्हणाले. आपल्या पुत्राला क्लिनचिट स्वत:हून दिली.  सुशां‌त सिंह मृत्यू प्रकरणात एक मंत्री आत जाईल तो यांचा पूत्र असेल.  पदाचा वापर करून वाचवलं जातंय? असा देखील सवाल राणेंनी विचारला. दिशावर बलात्कार कुणी केला, वरून कुणी टाकले? असा सवाल देखील या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. 


मुख्यमंत्र्यांवर टीका 


कोरोनात पिंज-यात होता. घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतो. असं म्हणत टीका केली. कुणी सांगितले वाघ आहे ? पिंज-यातला की पिंज-याबाहेरचा? अपयश झाकण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे दसरा मेळावा.  संजय राऊत हा विदूषक आहे, असं म्हणत यावेळी राऊतांवर देखील टीका केली.  कुठल्या धुंदीत बोलतोय हा, की रिया चक्रवर्तीनं काही पाठवले. हतबल झाल्याने बेताल भाषण केल्याचा आरोप लगावण्यात आला. पिंज-यात बसून काही होत नाही, घराबाहेर पड,  असा मुख्यमंत्री होणं हे राज्याचे दुर्देव असल्याच राणे म्हणाले. 


आमच्या नेत्यांना बोलल्यास जशास तसे उत्तर देवू. मुख्यमंत्री हा खेळण्यातला असल्याचं म्हटलं. खेळण्यातला मुख्यमंत्री आहे.  कटपुतली हातानं नाचते तरी तुला नाचताही येत नाही.  १६ हजार कोटी गुंतवणूक ही केवळ कागदावर आहे. बेकारीबद्दलही उल्लेख नाही.  यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. ५६ आमदार आलेत ते मोदींच्या नावावर. अन्यथा २५ आमदार आले. बेईमानी करून हिंदुत्वाला मूठमाती देवून मुख्यमंत्री पद मिळवले.  आपल्या पुत्राला क्लिनचिट स्वत:हून दिली.