दीपक भातुसे / मुंबई : काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांच्या पुढील राजकीय वाटचाली संदर्भात अद्यापही संभ्रम कायम आहे. काल राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांशी चर्चा केली. मात्र या दिल्लीवारी नंतरही राणेंचा भाजप प्रवेश अद्याप निश्चीत झालेला नाही. त्यामुळे राणे आता नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दिल्लीतील बैठकीत अमित शाहांबरोबर भाजप प्रवेशाबद्दल राणेंची कुठलीच चर्चा झाली नाही राणे सिंधुदुर्गात उभारत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाबाबत राणेंची ही भेट असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जातेय. तर दुसरीकडे राणे भाजपात प्रवेश करणार नाहीत ते स्वत:चा वेगळा पक्ष काढतील आणि भाजप आघाडीत सामील होतील, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. 


कॉंग्रेस सोडण्याची घोषणा करून सहा दिवस झाले तरी राणेंनी स्वत: सुद्धा आपली पुढील राजकीय वाटचाल कशी असेल हे स्पष्ट केलेले नाही त्यामुळे गेले राणे काय करणार हा गेले सहा महिने चर्चेत असलेला प्रश्न कायम आहे.