नरेंद्र मोदींनी केले आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकरचे कौतुक
`स्वच्छता ही सेवा` या मोहिमे अंतर्गत सचिन तेंडुलकर सह अर्जुन तेंडुलकर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रा येथील बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई केली.
मुंबई : 'स्वच्छता ही सेवा' या मोहिमे अंतर्गत सचिन तेंडुलकर सह अर्जुन तेंडुलकर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रा येथील बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई केली.
त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांनी त्याच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवावा असे आवाहन सचिन आणि आदित्यने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी सचिन तेंडुलकर आणि आदित्यचे ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले.
माझा तरूण मित्र आदित्य ठाकरे याने मुंबईत साफसफाईच्या मोहिमेत तसेच 'स्वच्छता ही सेवा' या अभियानामध्ये सहभाग घेतल्याने त्याचे कौतुक करतो. असे खास ट्विट केले.
आदित्य प्रमाणेच सचिनचे कौतुक करताना मोदींनी लिहले, ' स्वच्छ भारत मोहिमेतील सचिनच्या कामाचेही मी कौतुक करतो. मला आशा आहे, नागरिक त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतील. '
सचिन आणि आदित्य सोबतच अर्जुन तेंडुलकरनेही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. त्याचेही मोदींनी कौतुक केले.
'स्वच्छता ही सेवा' मोहिमेमेतील तरूणांचा समावेशही कौतुकास्पद आहे. त्यात अर्जुनचाही समावेश होता. हीच युवा शक्ती स्वच्छ भारत करेल.