मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान निंदनीय आहे. एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे हे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच त्यांनी ईव्हीएममधअये फेरफार टाळण्यासाठी स्ट्राँगरुम आणि मतमोजणी ठिकाणी जॅमर लावायची मागणी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार घेऊन मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. राजीव गांधी यांच्याबद्दल मोदींचे उद्गार निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मतदान यंत्रात फेरफार टाळा, अशी मागणी त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून मतदान यंत्रातली फेरफार टाळण्यासाठी स्ट्राँगरूम आणि मतमोजणीच्या ठिकाणी जॅमर लावावे, असेही ते म्हणालेत.


५० टक्के व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्याचा विचार व्हावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच राज्य आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार १५०० कोटी रुपयांचे रोखे का काढत आहे, असा सवालही त्यांनी केला. 


पत्रकार परीषदेतील मुद्दे


- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे नेते दिवंगत राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो
- एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करणं हे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही
- पराभव समोर दिसत असल्याने अशी विधाने केली जात आहेत
- एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन शत्रूवरही टीका करू नये
- काँग्रेसने एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कधी टीका केली नाही
- राज्य सरकार १५०० कोटी रुपयांचे रोखे काढण्याची तयारी सरकारने केली आहे
- राज्याची आर्थिक स्थिती हलाखिची आहे
- ५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज राज्यावर आहे
- आता सरकारला ४ महिने शिल्लक आहेत, तेव्हा असे रोखे काढण्याचा अधिकार सरकारला आहे का?
- एवढी गरज काय रोखे काढण्याची?
- राज्याच्या आर्थिक स्थितीला हे साजेसे नाही