मुंबई : मुंबईत नरिमन पॉईंट ते कुलाबा सी-लिंक दोन वर्षात पूर्ण होणार असून, मुंबईकरांना ट्रॅफिकमधून मुक्तता मिळणार आहे.  या सी लिंकबाबत एमएमआरडीएकडून निविद्रा प्रक्रिया सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 कसा असेल हा सी-लिंक


लांबी - नरिमन पॉईंट ते कुलाबा सी लिंक 1.6 किमी 


मच्छीमारांच्या बोटींना अडथळा येऊ नये यासाठी पूल


समुद्रादरम्यान 100 मीटरचे अंतर ठेवलं जाणार


सी लिंकवर सायकलिंक ट्रॅक, नागरिकांना चालण्यासाठी वेगळा ट्रॅक


पुलावरून समुद्र पाहण्यासाठी गॅलरीही असणार


नरिमन पॉईंट ते कुलाबा या सी-लिंकचे काम मे महिन्यात सुरू होणार आहे. तर दोन वर्षात हा सी-लिंक पूर्ण करण्याचा उद्दिष्ट आहे. यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकमधून मुक्तता मिळणार आहे.


-


मुंबई महापालिकेडून मुंबई मेट्रोच्या 24 मालमत्ता सील


मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मुंबई मेट्रोच्या तब्बल 24 मालमत्ता सील केल्या आहेत. मुंबई मेट्रो वनने तब्बल 300 कोटी रूपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. मार्चअखेरपर्यंत करभरणा न झाल्यास पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिन्या खंडीत करण्याचा इशारा महापालिकेने मेट्रोला दिला आहे.


प्रसंगी मालमत्तांचा लिलावही करण्यात येईल अशी नोटीस देण्यात आलीय. मालमत्ता कर कोणी भरावा यावरून एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो वन यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर भरण्यात आलेला नाही.