नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी, सुखोई 30 विमानाचं टेक ऑफ... शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर आज धावपट्टीची यशस्वी चाचणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. वायुदलाचं C-295 या विमानाने यशस्वी लँडिंग केलं. लँडिंग होताच विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली.
Navi Mumbai Airport : नव्याने होणाऱ्या नवी मुंबई विमानतळासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची उपस्थिती होती. वायुदलाचं C-295 या विमानाने यशस्वी लँडिंग केलं. लँडिंग होताच विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही विमानात बसण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनंतर काही वेळातच लढाऊ सुखोई 30 (Sukhoi) विमानानेही यशस्वी टेक ऑफ केलं.
वायुदलाच्या लढाऊ विमानद्वारे चाचणी
नवी मुंबई विमानतळावरुन लवकच देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरु होणार आहे. यासाठी या विमानतळाच्या धावट्टीची चाचणी घेण्यात आली. धावपट्टीवरुन पहिलं उड्डाण घेणाच्या मान भारतीय वायूदलाच्या सी-295 या विमानाला मिळाली. धावपट्टीवरुन झेप घेतल्यानंतर या विमानाने काही वेळ आकाश उड्डाण केलं आणि त्यानंतर यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरवण्यात आलं. यावेळी विमानावर पाण्याचे फवारे उडवत सलामी देण्यात आली. 2025 पर्यंत नवी मुंबईचं हे विमातळ सुर होईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
C-295 विमानानंतर हवाई दलाच्या सुकोई विमानाने धावपट्टीवरुन उड्डाण केलं. हा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहावी यासाठी सिडकोने पीएम कार्यालयाकडे वेळ मागितला होता,पण पीएम मोदी परदेशात असल्याने महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पुढच्या काही महिन्यात या धावपट्टीवर अनेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत, त्यानंतर प्रत्यक्षात विमान उड्डाणाला परवानगी दिली जाणार आहे.
प्रवाशांसाठी फायदेशीर प्रकल्प - फडणवीस
नवी मुंबई विमानतळाच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरुन दर वर्षी अंदाजे 9 कोटी प्रवासी प्रवास करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.