सहाय्यक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर बेपत्ता
सहाय्यक आयुक्त अचानक बेपत्ता झाल्याच्या बातमीमुळे सध्या पोलिस खात्यामध्ये खळबळ पसरली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याची तक्रार एनआरआय पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
नवी मुंबई: सहाय्यक आयुक्त अचानक बेपत्ता झाल्याच्या बातमीमुळे सध्या पोलिस खात्यामध्ये खळबळ पसरली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याची तक्रार एनआरआय पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
राजकुमार चाफेकर असे त्यांचे नाव असून 6 एप्रिलला रात्री आठ वाजता घरातून निघून गेले आहेत, त्यांनी सोबत मोबाईल फोन देखील नेला नाही, त्यानंतर ते कोणाच्या संपर्कात नाहीत. शुक्रवारी 8 च्या सुमारास राजकुमार त्यांच्या सीवुड्स येथील राहत्या घराच्या आवारातून बाहेर पडतानाची काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहेत.
राजकुमार घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी संध्याकाळी चाफेकर यांची मिसिंग केस दाखल केेली आहे. त्यांचा शोध सुरु असल्याचे एनआरआय पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितले. राजकुमार चाफेकर विशेष आर्थिक शाखेचे सहाय्यक आयुक्त आहेत.