Mumbai Crime News: अभिनेता अमेय वाघ याचा 2017 साली आलेला फास्टर फेने (Faster Fene) सिनेमा खूप गाजला. अॅडमिशन प्रोसेस (Admission Process) आणि त्यामागे चालणारा शिक्षणाचा खेळखंडोबा दाखवण्यात आला होता. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईत पहायला मिळाला आहे. एमबीबीएसला ऍडमिशन (Medical admission) मिळवून देण्याचं अमिष दाखवून गरजू विदयार्थी व पालकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला नेरुळ पोलिसांनी (Nerul Police) अटक केली आहे. (Navi mumbai Medical MBBS admission crime story Nerul Police arrest accused marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या टोळीने एमबीबीएसला ऍडमिशन (MBBS Admission) मिळवून देण्याच्या अमिषाने देशभरातील अनेक गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचं तपासात आढळून आलंय.  या टोळीने मुंबई, नवी मुंबई, रायगड, भंडारा या भागात केलेले फसवणुकीचे 5 गुन्हे उघडकीस आले असले तरी या टोळीविरोधात महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी अर्ज दाखल आहेत.


अनेक तक्रारी अर्ज दाखलने या टोळीने केलेले अशाच प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस आयुक्त मिलींद भारंबे (Police Commissioner Milind Bharmbe) यांनी व्यक्त केली. पोलिसांनी अटक केलेल्या टोळीमध्ये सौरभ कृष्णा उपाध्याय (39), इफ्तेखार अहमद मुस्ताक अहमद उर्फ अभय सिंग उर्फ गौतम (31), लव अवधकिशोर गुफ्ता (35), आकिब नौशाद अहमद (28) आणि अभिजात्य राधेशाम सिंग (41) अशी या पाच जणांचा समावेश आहे.


आणखी वाचा - Crime News: भाऊ कामाला गेल्यावर भाभीच्या खोलीत शिरायचा दीर, एक दिवस दोघंही घावले अन्...


दरम्यान, टोळीने काही महिन्यापूर्वी खोटे नाव सांगून करुन छत्तीसगड येथील विनोदनी यादव यांच्या मुलीला नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल युनिवर्सिटीमध्ये एमबीबीएसला ऍडमिशन मिळवुन देण्याचे अमिष दाखविलं होतं. तसेच त्यांच्याकडून डोनेशन आणि फिच्या नावाखाली 33 लाख 50 हजार रुपये उकळून त्यांना डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल युनिवर्सिटीचे बनावट ऍडमिशन लेटर देवून त्यांची फसवणूक केली होती.