VIDEO: रेल्वे लाईन ओलांडताना लोकलखाली अडकला तरुण; प्रवाशांनी ट्रेनला धक्का देऊन वाचवला जीव!
Mumbai Latest News : नवी मुंबईच्या वाशी स्थानकात भीषण अपघात घडला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एक तरुण रेल्वेखाली अडकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Navi Mumbai Local Accident News : मुंबईकरांची लाइफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये अपघाताच्या घटना सातत्याने पाहायला मिळतात. यामध्ये अनेकांनी जीव देखील गमवावा लागतो. अशातच नवी मुंबईत लोकल अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. लोकलमध्ये चढताना एक प्रवासी थेट रेल्वेखाली गेल्याचा प्रकार हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात घडला. यानंतर प्रवाशांनी माणुसकीचे एक विलक्षण दर्शन घडवल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
नवी मुंबईतील वाशी स्टेशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रेल्वे प्रवासी लोकल ट्रेनला ढकलताना दिसत आहेत. एक तरुण लोकल ट्रेनमध्ये चढताना खाली पडून प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकल्याचे समोर आले. त्यानंतर तिथे उपस्थित प्रवाशांनी ट्रेनला धक्का देत त्या प्रवाशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रवासी संपूर्ण ट्रेन ढकलण्यासाठी एकत्र जमले होते. सर्वजण चाकाखाली अडकलेल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये प्रवासी अडकलेल्या प्रवाशाची सुटका करण्यासाठी ट्रेनला धक्का देत असल्याचे दिसत आहे, मात्र त्यांच्या प्रयत्नात ते सुरुवातीला अयशस्वी झाले. दरम्यान, रेल्वेच्या क्लोज सर्किट टीव्ही फुटेजमध्ये तो माणूस समोरच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रुळांवर उडी मारत होता.
पनवेलला जाणाऱ्या लोकल ट्रेनने अपघात टाळण्यासाठी अचानक आपत्कालीन ब्रेक लावल्याने हा माणूस रुळ ओलांडताना ट्रॅकखाली सापडला. त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी तिथल्या इतर प्रवाशांनी एकत्रितपणे 12-कॅरेज लोकोमोटिव्हला बाजूला करण्यासाठी ताकद लावली. Reddit वर हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने, "जेव्हा मी हे रेकॉर्ड केले, तेव्हा लोक फक्त लोकलला धक्का देत होते. नंतर, सर्वांनी एकाच वेळी लोकलला पुढे ढकलले आणि त्याला बाहेर काढले," असे म्हटलं आहे.
Person got caught under the train, crowd pushes off the train and pulls them out. [SFW]
byu/Cat_Of_Culture innavimumbai
व्हायरल व्हिडीओवर लोकलचा डबा उचलणाऱ्या प्रवाशांचे लोकांनी कौतुक केले आहे. जपान वाइब्स. ही अशा प्रकारची गर्दी आहे जी एखादी व्यक्ती ट्रेनखाली अडकलेली असताना त्याच्यावरुन ट्रेनमध्ये न जाता त्याला बाहेर काढण्याचे काम करत आहे, असे एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने नवी मुंबईचा आत्मा अद्भुत आहे! असे म्हटलं आहे.
दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली की रुळ ओलांडताना हा प्रकार घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच रेल्वेने प्रवाशांना फूट ओव्हर ब्रिज आणि अंडरपास वापरण्याचे आवाहन केले.