मुंबई : शनिवारी नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. घटस्थापनेच्या दिवशीच दुर्मिळ घटना घडली. कल्याणमधील वैष्णवी रुग्णालयात एकाच दिवशी नऊ मुलींचा जन्म झाला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरात्रीचा पहिला दिवस कल्याणातील वैष्णवी रूग्णालयासाठी काहीसा खास आणि दुर्मिळ असाच ठरला. या रुग्णालयात काल एकाच दिवशी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची अनोखी घटना घडली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडेच चर्चा होत आहे


नवरात्रीचा पहिला दिवस कल्याणातील वैष्णवी रूग्णालयासाठी काहीसा खास आणि दुर्मिळ असाच ठरला. या रुग्णालयात काल एकाच दिवशी...

Posted by मी कल्याणकर - me_kalyankar on Sunday, October 18, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड योद्धा आरोग्य कर्मचारी युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. कल्याणच्या वैष्णवी रुग्णालयातही अशाच प्रकारे यंत्रणा राबत होती. मात्र, घटनस्थापनेच्या दिवशी आलेल्या या शुभसंकेताने सर्व कोविड योद्ध्यांमध्ये एकच उत्साह संचारला.  रूग्णालयात ११ गर्भवती महिला दाखल झाल्या होत्या. त्यातील ९ महिलांनी मुलींना जन्म दिला तर दोन महिलांनी मुलांना जन्म दिला. 


एकाच दिवशी नऊ मुलींनी जन्म घेतला हा क्षण इथल्या कर्मचाऱ्यांसाठी भावूक आणि तितकाच उत्साह देणारा ठरला होता. आपल्या रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत असताना खुद्द नवदुर्गांनीच अवतार घेतल्याची भावना साऱ्यांनी व्यक्त केली आहे. कल्याणच्या सुप्रसिध्द डॉ. अश्विन कक्कर यांची सामाजिक आणि संवदेनशील व्यक्ती म्हणून सर्वत्र ओळख आहे.