मुंबई : महाविकास आघाडीचे मोठे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या अँटकेनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. (Nawab Malik will resign from minister post)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. 
मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा. ही महाराष्ट्राची परंपरा आहे.' अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


'महाराष्ट्रातील एका मंत्र्यांला तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला, एक आत आहेत, एका नेत्याचे अनधिकृत बंगला पाडण्यात आले, एका नेत्याचे अनधिकृत रिसॉर्ट आहे, एका मंत्र्याला दोन पत्नी आहेत. किती मोठी यादी आहे. काय चाललंय हे? कोलमडले आहे सगळं.' अशी 
टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


महाविकास आघाडीचे काही नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. आज रात्री ही भेट होण्याची शक्यता आहे. 


राजकीय घडामोडी वेग


नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.