मुंबई : Nawab Malik arrives at ED Office : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. (NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai) आज सकाळी 7 वाजता मलिक यांना त्यांच्या घरातून ईडी अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले. आज सकाळी 8 वाजल्यापासून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडच्या कोठडीत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इब्राहिम कासकर याने चौकशीत नवाब मलिक यांचं नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
कुठलीही नोटीस न देता नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेने केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जमू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाआहे. 


नवाब मलिक यांचं कुटुंबिय देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती युवक प्रदेशचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिली आहे. नवाब मलिक यांची बहिण नगरसेविका डॉक्टर सईदा खान आणि मुलगी सना खानदेखील एनसीपी कार्यालयात आल्या आहेत. 


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या मुलीला फोन केल्याची माहिती आहे. नेमकं काय घडलं याची माहिती त्यांनी घेतली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही फोन करुन माहिती घेतल्याचं समजतंय.


नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत अल्याने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी इथल्या बैगलाडा शर्यतीला दिलीप वळसे-पाटील यांनी हजेरी लावणार होते. पण हा दौरा रद्द करुन गृहमंत्री तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.