मलिक यांचा पुन्हा समीर वानखेडे यांच्यावर आरोप, शाळा सोडल्याचे दोन दाखले समोर
Nawab Malik On Sameer Wankhede : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे.
मुंबई : Nawab Malik On Sameer Wankhede : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांचे शाळा सोडल्याचे दोन दाखले समोर आले आहे. या दोन्ही दाखल्यांवर समीर वानखेडे यांच्या धर्माचा उल्लेख मुस्लिम आहे. वानखेडे हे मुस्लिम आहेत, असे नवाब मलिक म्हणाले. (Nawab Malik's criticism of Sameer Wankhede)
समीर वानखेडे यांचे शाळा सोडल्याचे दोन दाखले समोर आले आहे. सेंट पॉल आणि सेंट जोसेफ या दोन शाळांचे दाखले समोर आले आहेत. शाळांच्या दाखल्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. काल अभिनेत्री आणि पत्नी क्रांती रेडकरने हिने समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट केला होता. त्या दाखल्यावर समीर यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे, असे लिहले होते. हेच दाखले नवाब मलिक न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती दिली.
समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची सिद्धता होण्यासाठी आणि वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेविरोधात आणखी काही कागदपत्रे विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Hight Court) सादर करण्यात आली आहेत.
या कागदपत्रांमध्ये समीर वानखेडे यांचा शाळेचे प्रवेश पत्र आणि प्राथमिक शाळेचा सोडल्याचा दाखल सादर केला. त्यावर समीर वानखेडे हे ‘मुस्लीम’ असल्याचे नमुद केले आहे. नवाब मलिक आरोप करताना म्हणाले, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम असून त्यांनी केंद्र सरकारची नोकरी मिळविताना अनुसुचित जातीचे (शेड्युल कास्ट) असल्याचे दाखवले आहे. हा फर्जिवाडा आहे. त्यांची नोकरी जाणार.