मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले होते, कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये असताना समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील लोकही तिथे होते असा आरोप करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मालदीव, दुबईमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? असे सवाल उपस्थि केले होते. मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. नवाब मलिक माननीय मंत्री आहेत, पण नवाब मलिक जे आरोप करत आहेत, ते खूप घाणेरडे आरोप आहेत, आणि खोटे आरोप आहेत. नवाब मलिक यांनी जो आरोप केलेला आहे, मी दुबईला गेलो होते, पण सर्व्हिसनंतर मी कधीच दुबईला गेलो नाही, असं समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे.


मालदीवला मी रितसर परवानगी घेऊन, माझ्या कुटुंबाबरोबर आणि माझ्या स्वत:च्या खर्चाने गेलो होतो, मला कोणालाही उत्तर द्यायची गरज नाही, मी सरकारला उत्तर देण्यास बांधिल आहे. सर्व खोटे आरोप आहेत, जी काय कायदेशीर कारवाई करायची आहे ती करु असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. 


माझ्या आईवर, बाबांवर, ताईवर सर्व कुटुंबावर आरोप केला जात आहे, एका मोठ्या व्यक्तीला हे शोभण्यासारखं नाही. अंमलीपदार्थ विरोधात जे आमचं काम सुरु आहे, त्यातही मोठा अडथळा येतो, पण ठिक आहे आम्ही आमचं काम करत राहू असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.