आशिष शेलार यांचा मलिक यांना टोला, `चल हट, चला हवा येऊ द्या`
Mumbai drugs case : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांच्यामध्ये जुंपली आहे.
मुंबई : Mumbai drugs case : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांच्यामध्ये जुंपली आहे. समीर वानखेडे हे भाजपचा पोपट असल्याचा आरोप मलिक यांनी केला. तर रोज राष्ट्रवादीचा पोपट बोलतोय, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे. या वादात आशिष शेलार यांनीही उडी घेतली आहे. 'पिक्चर अभी बाकी है' या मलिकांच्या डायलॉगला, चल हट, चला हवा येऊ द्या म्हणत मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक ( Nawab Malik) यांचा चांगलाच समाचार घेतला. मलिक दिवसभर बोलत असतात त्यांना दुसरे काम नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. आता मलिक काय प्रतित्युत्त देणार याची उत्सुकता आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी टाळले आहे. ते दिवसभर काहीतरी बोलत असतात, आता सध्या त्यांना दुसरे कामे नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही, असे सांगत मलिक यांनी केलेल्या आरोपांना महत्व देत नसल्याचे सांगितले. तर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत या मलिक यांच्या आरोपांवर मात्र कोणाचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्याच्यामुळे कोण कोणाचा पोपट आहे? तुमच्या करता हे महत्त्वाचे असेल आमच्याकरिता नाही, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली .