मुंबई : एनसीबी (NCB)अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकारने आता मोठा दणका दिला आहे. ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांच्या सदगुरु हॉटेल आणि बारचा परवाना रद्द केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायानगरी मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई परिसरात सध्या हा बार आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी हा परवाना घेतला तेव्हा त्यांचे 18 वर्षांपेक्षा कमी होते. त्यानंतर या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु होती.


नवाब मलिक यांच्या आरोपानंतर ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी सुरु होती. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपला अहवाल जिल्हा दंडाधिकारी (DC) यांना सादर केला. ज्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 54 अन्वये कारवाई करुन परवाना रद्द केला आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हा दंडाधिकार्‍यांसमोर सुनावणीदरम्यान सादर केलेले पुरावे. त्यानुसार, समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील सदगुरु हॉटेल अॅण्ड बारचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी त्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असताना जारी करण्यात आला होता. मात्र, नियम डोळ्यासमोर ठेवून समीर वानखेडे यांना परवाना देण्यात आला, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.


महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी नवी मुंबईत सदगुरु रेस्टॉरंट अॅण्ड बार नावाचे हॉटेल सुरु असल्याचा आरोप केला होता. ज्याचे मालक समीर वानखेडे आहेत. या हॉटेलचा परवाना समीर वानखेडे यांच्या वडिलांनी त्यांच्या नावाने काढला होता. परवाना दिला तेव्हा समीर वानखेडेचे वय 17 वर्षे 10 महिने 19 दिवस होते. म्हणजेच समीर वानखेडे हे त्यावेळी अल्पवयीन होते. मात्र त्यांच्या वडिलांनी त्याची पर्वा न करता अल्पवयीन मुलाच्या नावाने बार सुरु केला होता. जो कायदेशीर गुन्हा आहे.