प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई :  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज होत असतानाच मोठ-मोठ्या पार्ट्यांमध्ये अंमलीपदार्थ पोहचवण्यासाठी ड्रग्स माफियाही तयारी करत आहेत. अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) याबाबत मोठे खुलासे केले आहेत. मुंबई एनसीबीने धडक कारवाई करत सुमारे 18 करोड रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे अंमलीपदार्थांच्या तस्करीसाठी चक्क डॉक्टरांच्या स्टेथसकोपचाही वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे.


इतकंच नाही तर सायकलचं हेल्मेट, टाय, हार्ड डिस्क आणि बांगड्यांमधूनही अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज माफियांनी ड्रग्ज तस्करीचे हे नवे फंडे शोधून काढले आहेत. 


जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ
4.90 ग्रॅम मेटाफेटामाईन - स्टेथसस्कोपमध्ये
4 किलो अफीम मायक्रोव्हेवमधून मालदीवला पाठवण्याची तयारी
2.5 किलो झोपीडीयम 10 हजार टॅब्लेट खाण्याच्या पदार्थातून अमेरीकेत पाठवण्याची तयारी
4.95 ग्रॅम एमफेटमाईन सायकल हेल्मेटमध्ये आणि 4.56 ग्रॅम एमफेटमाईन बांगड्यांमधून ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी
8.48 ग्रॅम मेटाफेटामाईन हॉर्स पाईमध्ये लपवून दुबईला पाठवण्याची तयारी
3.90 ग्रॅम एमफेटाईम टाय बॉक्समधून जप्त 
17 ग्रॅम एमफेटामाईन कॉम्प्युटर हार्ड डिस्कमधून स्वित्झर्लंडमध्ये पाठवण्याची तयारी


मुंबईतल्या दक्षिण भागात आणि उपनगरात एनसीबीनं 18 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपासून याबाबत एनसीबीचं ऑपरेशन सुरु होतं. यामध्ये एकूण 8 ठिकाणी कारवाई करण्यात आली. बनावट नावाने हवाईमार्गे हे अंमली पदार्थ पाठवले जाणार होते.


एनसीबीने मुंबईत एकूण आठ ठिकाणी कारवाई करत सुमारे 18 कोटींचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. यात एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेतलं असून एनसीबी याप्रकरणी अधिक तपास करत आहे. 


यातील काही अमली पदार्थ परदेशात निर्बध असल्याने कोट्यावधी किमतीला विकले जातात आणि त्यासाठी हे अंमली पदार्थ छुप्या मार्गाने भारतातुन पाठवले जात आहेत.