मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Health Update) यांना पोटात दुखत असल्याच्या तक्रारीवरून ब्रीच कॅन्डी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना पित्त मूत्राशयामध्ये त्रास असल्याचे निदान झाले होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi ) , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnv, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली. दरम्यान शरद पवार हे शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या त्यांच्यावर या ठिकाणी शस्त्रक्रिया होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर पवार यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत पवारांना पित्ताशयाचे निदान झाले आहे. पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकांकडून विचारपूस करण्यात येत आहे. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहेत.


माझे सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मित्रमंडळींनी व सुहृदांनी आवर्जून तब्येतीच्या चौकशीसाठी फोन केले, संदेश ठेवले. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांचे बळ मिळाले. मनपूर्वक धन्यवाद!, असे पवार यांनी ट्विट केले आहे.