मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक जणांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी करत लवकर लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच रोहित आणि पार्थ या दोन नातवांनी पोस्ट केली आहे. रोहित आणि पार्थ पवार यांनी भावनिक ट्विट करत आजोबांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.


रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आजोबा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच आमदार रोहित पवार यांनी भावनिक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे, 'आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय... योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!



दरम्यान अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनीही ट्विट करत आजोबांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'आजोबा काळजी घ्या, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल'



पंतप्रधानांनीही केली विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करुन  ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये शरद पवार पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.


शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. त्याच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे'