मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी दिल्लीत (delhi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांची भेट घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेवरुन जळगाव (jalgaon) जिल्ह्यासह राज्यभरात राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. मुक्ताईनगरचे (muktainagar) आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह (amit shah) यांची भेट घेतल्याचा दावा केलाय. (Eknath Khadse Amit Shah meeting in Delhi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच चर्चांवरुन एकनाथ खडसे (eknath khadse) हे भाजपात (BJP) घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना ऊत आलाय. याबाबत आता भाजप खासदार रक्षा खडसे (raksha khadse) यांनी सासरे एकनाथ खडसे दिल्लीत अमित शाहांशी (amit shah) भेट झाल्याच्या दाव्याला नकार दिला आहे. मात्र दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मात्र एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्यातील चर्चेमागचा सस्पेन्स कायम आहे. 


याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी या केवळ अफवा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याचं खडसेंनी मान्य केलंय. विकासकामांबाबत ही चर्चा झाल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.


या सर्व अफवा - एकनाथ खडसे


"राष्ट्रवादीचा त्याग करुन मी भाजपात जाणार या निव्वळ अफवा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मला आमदारकी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा त्याग करण्याचा प्रश्न मनात येत नाही. मी अमित शाह यांची भेट घेतलेली नाही. मी त्यांच्यासोबत फोनवरुन बोलणं केलं आहे. याची कल्पना मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला सांगितलं की, मी स्वतः तुमच्यासोबत येईन. काही विषय त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. शरद पवार सोबत असताना ते भाजपमध्ये येण्यासाठी प्रस्ताव देणार नाहीत. त्यामुळे या सर्व अफवा आहेत," असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.