मुंबई : शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. तासनतास एकाच ठिकाणी कोंडीमुळे राहावे लागते. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबई लोकलचा सहारा घ्यावा लागला. अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली असा प्रवास लोकलने केला. त्यांनी कसारा जलद लोकलने डोंबिवलीसाठी प्रवास केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांना डोंबिवलीत एका नियोजित कार्यक्रमासाठी जायचे होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून निघाले होते. पण वाहतूक कोंडीमुळे वेळेत कार्यक्रमाला पोहोचू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यातच रस्त्याने प्रवास करणे वाहतूक कोंडीमुळे शक्य नव्हते. त्यामुळे अजित पवार यांनी लोकलने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत कसारा लोकलमध्ये प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड होते. अजित पवार यांनी डोंबिवलीला जाण्यासाठी सीएसएमटीवरून कसारा जलद लोकलने प्रवास केला, याचा व्हिडिओ राष्ट्रवादीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.



अजित पवार यांनी सीएसटीएम ते कसारा या जलद लोकलमधून डोंबिवलीपर्यंत प्रवास केला. त्यांनी चक्क विंडो सीट पकडली देखील. मुंबई लोकलने प्रवास करताना विंडो सीट पकडणे किती जिकरीचे असते, हे मुंबईकरांना सांगण्याची गरज नाही. मात्र, अजित पवार विंडो सीटला बसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या विंडो सीटचीच अधिक चर्चा होत आहे.