रोहित पवारांचा लोकलनं प्रवास आणि जुन्या आठवणींना उजाळा
रोहित पवारांनी मुंबई लोकलंन प्रवास केला आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला.
मुंबई : राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार हे आपल्या साध्या राहणीसाठी ओळखले जातात. त्यांचं सहज बोलणं, पेहराव, साधी राहणी यामुळे ते तरुणांच्या गळ्याचे ताईत बनलेयत. सध्या त्यांच्या लोकल प्रवासाचे फोटो सोशल मीडियात चर्चेत आहेत. मुंबईत काही कामानिमित्त आलेल्या रोहित पवारांनी मुंबई लोकलंन प्रवास केला आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार हे आपल्या साध्या राहणीसाठी ओळखले जातात. त्यांचं सहज बोलणं, पेहराव, साधी राहणी यामुळे ते तरुणांच्या गळ्याचे ताईत बनलेयत. सध्या त्यांच्या लोकल प्रवासाचे फोटो सोशल मीडियात चर्चेत आहेत. मुंबईत काही कामानिमित्त आलेल्या रोहित पवारांनी मुंबई लोकलंन प्रवास केला आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला.
मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलनं प्रवास करण्याचा योग आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाईफ लाईन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.