मुंबई : महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसनं आज राज्यभर मूकमोर्चांचं आयोजन केलं आहे. मुंबईत पक्षाचे नेते अजित पवार यांच्या मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मंत्रालयजवळ असलेल्या गांधी पुतळ्याच्या बाजूला अजित पवारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही हा मोर्चात सहभागी झाले आहेत.


सरकारच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांचा निषेध करत आंदोलन करण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस या जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, राफेल घोटाळा, विचारवंतांच्या हत्यांचे रखडलेले तपास, छत्रपती शिवरायांच्या प्रस्तावित स्मारकाची अचानक कमी झालेली उंची, शेतकरी आत्महत्या, शिक्षक भरती आणि अन्य प्रश्नांबाबत सरकारच्या विरोधात या आंदोलनात निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.