NCP President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शरद पवारांनी (Sharad Pawar) भाकरी फिरवली.. शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. प्रफुल्ल पटेलांकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्यांची जबाबदारी दिलीय. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवक, युवती आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आलीय. सुनील तटकरे हे राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या जबाबदारीसह ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी समस्या, अल्पसंख्याकांचे (Minorities) प्रश्न ही जबाबदारी देण्यात आलीय. राज्यातून जितेंद्र आव्हाडांकडेही (Jitendra Awhad) बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, ओबीसी, एससी एसटी ही जबाबदारी देण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांकडे एकही जबाबदारी नाही
याशिवाय सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडे राष्ट्रीय महासचिवबरोबरच ओडिशा, पश्चिम बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच शेतकरी आणि अल्पसंख्यांक विभागचे प्रभारी म्हणूनही ते काम पाहाणार आहेत. नंदा शास्त्री यांची दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी तर फैसल यांची तामिळनाडू, तेलंगना आणि केरळ राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पण अजित पवार यांच्याकडे एकही जबाबदारी देण्यात आलेल नाही. 


अजित पवार-शरद पवार यांचं काका-पुतण्याचं नातं आहे. अजित पवारांचा राजकारणाचा कल हा या कायम राज्याच्या राजकारणाकडे राहिलाय. बारामती मतदारसंघातून (Baramati Constituency) अजित पवार दरवेळी विक्रमी मताधिक्यानं राजकारणातून निवडून येतात. त्यांची प्रशासनासह पक्षबांधणीतही अजित पवारांचा हातखंडा आहे. अजित पवारांना मानणारा वर्ग पक्षात आहेत,.  मला दिल्लीच्या राजकारणात रस नाही असं अजित पवारांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक लक्षात घेता अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता होती. पण ती जबाबदारीही सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात अजित पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार की त्यांना साईडट्रॅक करण्यात आलं आहे याची आता चर्चा सुरु झाली आहे. 


अजित पवारांचं ट्विट
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांना नवं कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया आलीय. अजित पवारांनी नव्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या सहकाऱ्यांचं अभिनंदन केलंय. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. असं म्हटलं.


अजितदादा नाराज?
अजित पवार नाराज नाहीत, असं भुजबळांनी म्हटलंय. शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी घोषणा केली. मात्र अजित पवारांवर कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. त्यानंतर अजित पवार कुठलीही प्रतिक्रिया न देता निघून गेले... अजित पवार बाहेर येताच माध्यमांचा अजित पवारांना गराडा पडला. मात्र अजित पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, अजित पवार एकही शब्द बोलले नाहीत. आणि न बोलताच अजित पवार निघून गेले.... मात्र अजित पवार नाराज नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.