मुंबई : शिवसेनेच्या आमदार डॉ नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत उपसभापतीपदी निवड झाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आरपीआयचे जोगेंद्र कवाडे देखील इच्छूक होते. पंरतु त्यांनी माघार घेतली. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेत २००२ पासून आमदार आहेत. नीलम गोऱ्हे यांनी अनेक पद भूषवले आहेत.


विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदेत शिवसेनेचे १२ तर भाजपचे २३ आमदार आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनुक्रमे १६ आणि १७ आमदार आहेत.  अपक्ष ६ आमदार आहेत. तर  लोकभारती, शेकाप, रासप आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रत्येकी १ आमदार आहेत.