नीरव मोदी, मेहुल चोकशीच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात
नीरव मोदी आणि मेहूल चोकशी यांच्यासह त्यांच्या परीवारातील सदस्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात
मुंबई : तपास यंत्रणांनी नीरव मोदी आणि मेहूल चोकशी यांच्यासह त्यांच्या परीवारातील सदस्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात केली आहे. यात नीरव मोदी आणि त्याच्या परीवारातील सदस्यांच्या ९ अलिशान गाड्या तपास यंत्रणांनी जप्त केल्या आहेत.
७ कोटी ८० लाख रुपयांचे म्युअचल फंड
तसंच मोदी परीवाराच्या नावे असलेले ७ कोटी ८० लाख रुपयांचे म्युअचल फंड आणि शेअर्स तर, मेहूल चोकशी आणि परीवाराच्या नावे असलेले ८६ कोटी ७२ लाख रुपयांचे म्युचअल फंड आणि शेअर्स देखील जप्त करण्यात आलेत.
महागड्या वस्तूंची मोजदाद सुरु
एवढचं नाही तर या दोघांच्या घरी तपास यंत्रणांनी जी धाड मारली होती त्यात मिळालेल्या महागड्या वस्तूंची मोजदाद सुरु असून कोट्यावधी रुपयांच्या पेंटींगस् देखील जप्त करण्यात आल्या आहेत.