मुंबई : बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. डेल्टा (Delta) आणि ओमायक्रॉन (Omicrone) यांच्या संयोगातून तयार झालेला नवा घातक कोरोना महाराष्ट्रात (Maharashtra) आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातील साडेपाचशेपेक्षा जास्त रुग्ण रडारवर असून त्यात राज्यातील रुग्णांचाही समावेश असल्यानं चिंता वाढवली आहे.  (new corona virus composed of omicron and delta is likely to be found in several states including maharashtra and delhi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून तयार झालेल्या खतरनाक 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंटनं' (Deltacron Varient) भारतात एन्ट्री केल्याची भीती आहे. एका संकेतस्थळानं कोविड जीनोमिक्स कंसोर्सियम आणि GSAIDच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांत या व्हेरियंटचे 568 संशयित रुग्ण असल्याची शक्यता आहे. 



कर्नाटक हा डेल्टाक्रॉनचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती असून तिथं 221 संशयित रूग्ण आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये 99 आणि महाराष्ट्रात 66 रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 32, तेलंगणामध्ये 25 आणि नवी दिल्लीत 20 जणांच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. 


डेल्टाक्रॉनचा पहिला रुग्ण हा सायप्रसमध्ये आढळला होता. मात्र तेव्हा प्रयोगशाळेतील चुक समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता यंदा जानेवारीत फ्रान्समध्ये या व्हेरियंटचा फैलाव झाला आणि ब्रिटनमध्येही याचे रुग्ण आढळले. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्यात आणि त्यावर अधिक संशोधन सुरू केलंय. 


डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संयोगातून तयार झालेला डेल्टाक्रॉन हा सुपर सुपर म्युटेट व्हायरस असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. याला बी ए पॉइंट वन प्लस बी पॉइंट वन पॉइंट सिक्स वन सेव्हन पॉइंट टू असं शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे. 


चीन, हाँगकाँग आणि युरोपनंतर या व्हेरियंटनं भारतात प्रवेश केल्याची भीती आहे. याचा संक्रमणाचा वेग आणि मृत्यदर किती आहे यावर संशोधन सुरू आहे. मात्र याचे निष्कर्ष हाती येत नाहीत, तोपर्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अन्यथा चौथी लाट आलीच म्हणून समजा.