नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात महागाई वाढीला आमंत्रण देणारी
मुंबई : रविवारपासून म्हणजेच एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होतं आहे. वस्तू आणि सेवा कराच्या रूपात गेल्या वित्त वर्षांत अप्रत्यक्ष कर सुधारणेचा पहिला टप्पा राबविल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा नव्या आर्थिक वर्षांत सुरू होणार आहे. मात्र नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात महागाई वाढीला निमंत्रण ठरणारी आहे. अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या अतिरिक्त एक टक्के अधिभारामुळे ग्राहकांना विविध सेवांचा लाभ अधिक पैसे देऊन घ्यावा लागणार आहे.
अधिभाराचे प्रमाण एक टक्क्याने वाढवत, ते आता ४ टक्के करण्यात आलंय. भांडवली बाजारातील समभाग विक्रीवर होणाऱ्या एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या लाभावर 10 टक्के कर लावण्यात येणार आहे.