एलफिस्टनवरील नवीन ब्रीज प्रवाशांसाठी खुला
एलफिस्टन स्थानकावरील नवीन ब्रीज प्रवाशांसाठी खुला....
मुंबई : एलफिस्टन स्थानकावरील नवीन ब्रीज प्रवाशांसाठी खुला....
अरुंद पूल, तोबा झालेली गर्दी, त्यात असलेला पाऊस आणि अफवा यामुळे एल्फिन्स्टन स्थानक इथे 23 लोकांचा जीव गेला होता. ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली त्याच्या शेजारी तिकीट खिडकी पाडून नवीन पूल बांधण्यात येत होता त्याच काम आता पूर्ण झालं आहे. प्रवाशांनी याचा वापर सुरू केला आहे.
प्रवाशांना आता या पुलामुळे प्रवास करणं सोईचं होणार आहे. एलफिस्टनप्रमाणेच या पुलावरून परेल परिसरातील प्रवासी देखील प्रवास करतात. तसेच केईएम, वाडिया सारखी रूग्णालय येथे आहेत. त्यामुळे वेस्टर्न, सेंट्रल लाईनमधील प्रवासे या ब्रीजने प्रवास करतात. त्या सगळ्यांना आता सोईचे होणार आहे.