मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दूर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपुरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दूर्मीळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैववैविध्यात भर पडली आहे. या संशोधनानंतर तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांच्या टीमचं कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरिर रचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधुन घेत आहेत. तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी २०१४ सालीच  शोधून काढल्या होत्या. 




मात्र गेली पाच वर्षे या दूर्मीळ प्रजातींच्या पालींवर जुणूकिय तसेच इतर पालींपेक्षा या वेगळ्या का आहेत यावर प्राणी शरिर शास्त्रांच्या नियमानुसार अनेक सविस्तर संशोधन करण्यात आले. आणि या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव "मँग्निफिसंट डवार्फ गेको" असं करण्यात आले. या चारही तरुणांच्या संशोधक टीमने या नव्या प्रजातींच्या पालीवर केलेला शोधनिबंध आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या "झुटाक्सा" या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे. 



दरम्यान, तेजस ठाकरे यांनी याआधी सापाच्याही दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. तसेच मागील वर्षी दुर्मिळ जातीच्या खेकड्याचा देखील शोध लावला होता.