मुंबई : Mumbai local travel news :‘एसी’ लोकलमधून सर्वसामान्य प्रवाशांनाही आता प्रवास करता येणार आहे. ‘एसी’ लोकलमधून ( Mumbai ac local) प्रवास करता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने नवीन योजना आखली आहे. रेल्वेच्या तिकीटदरांतील फरकाचे पैसे भरून प्रवास करण्यास परवानगी मिळणार आहे. ( Mumbai ac local travel  )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांनी तिकीट टीसीकडे भाडेदरातील फरकाची रक्कम जमा केल्यास त्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल. याबाबत सध्या चाचपणी करण्यात येत आहे. महिनाभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांनी दिली.


पश्चिम रेल्वेवर  पहिली एसी लोकल डिसेंबर 2021 मध्ये धावली. या लोकलच्या दिवसाकाठी बारा फेऱ्या चालविल्या जात आहेत. चर्चगेट ते बोरिवली, विरारदरम्यान धावणाऱ्या या एसी लोकलमधून कोरोनापूर्वकाळात दर दिवशी 18 ते 20 हजार प्रवाशी प्रवास करीत होते. कोरोनाकाळात ही लोकल काही महिने बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर आता ही एसी लोकल पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र, तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही नवी संकल्पना आमलात आणण्यात येणार आहे.


एसी लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांसाठी एक वेगळा प्रयोग करण्यात येणार आहे. फलाटावर सामान्य लोकलची प्रतीक्षा करणारे प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करु शकतात. मात्र, वरचे पैसे त्यांना भरावे लागणार आहेत.  त्यासाठी सामान्य लोकलचे तिकीट आणि एसी लोकलच्या भाडेदरातील फरक डब्यात उपस्थित तिकीट टीसीकडे भरून प्रवासाची मुभा मिळणार आहे.  


दरम्यान, एसी लोकलचे भाडे हे जास्तच असल्याने त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. नुकत्याच एसी लोकलबाबत केलेल्या सर्वेक्षणातही भाडेदर कमी करण्याची सूचना 52 टक्के  प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे अर्धवातानुकूलित लोकलचाही पर्याय पुढे आला. पण योग्य नाही. त्यामुळे प्रतिसादासाठी भाडेदर कमी करण्याचा पर्यायही पुढे येत आहे.