मुंबई: औरंगाबादच्या दंगलीनंतर पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत असतानाच आता शहराला पुढच्या तीन दिवसात नवा पोलीस आयुक्त  देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर काल रात्री उशिरा भेट घेतली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं. औरंगाबाद दंगलीप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी सर्वपक्षीयांनी या बैठकीत केली. त्यावर आयपीएस अधिकाऱ्यांची एक उच्च स्तरिय चौकशी समिती नेण्याचंही मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दंगलग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणीही यावेळी मान्य करण्यात आली.  दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून निरपराध लोकांची सुटका करण्यात येईल असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


महत्त्वाचे मुद्दे


सर्वपक्षीय मुस्लिम आमदारांनी औरंगाबाद दंगलीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
इम्तियाज जलील, वारीस पठाण, अमीन पटेल, अबू आझमी यांनी वर्षा निवास्थानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
व्हिडिओ फुटेजचे पुरावे सादर करून संबंधितांवर कठोर कारवाईची केली मागणी
औरंगाबाद दंगली प्रकरणी अतिरिक्त महासंचालक बिपीन बिहारी यांच्या अध्यक्षतेखाली IPS अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
दंगलीत नुकसान झालेल्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची दिले आश्वासन
दोषी पोलीस अधिकऱ्यांवर कठोर कारवाई, निरपराधांची सुटका केली जाणार
औरंगाबादला पुढच्या तीन दिवसात नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती करणार