मुंबई : एस्सेलवर्ल्ड या देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठ्या थीम पार्कने यंदाचा ख्रिसमस लहान-थोरांबरोबर मोठ्या प्रमाणात धमाकेदार पद्धतीने साजरा करायचे ठरवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस्सेलवर्ल्डमध्ये ख्रिसमस'च्या आनंदोत्सवाला 24 डिसेंबर रोजी सुरुवात होईल, यावेळी वेलकम बँड आणि संता आणि हाउस क्लोन यांने लोकांच्या भरघोस उत्साहात स्वागत केले जाईल. तसेच अविरत चालणारे खेळ, ट्रिक्स अँड थ्रेट्स यांची 1 जानेवारी 2018 पर्यंत रेलचेल असेल.


नऊ दिवसांच्या एस्सेल वर्ल्ड कार्निवलमध्ये, ख्रिसमसची सुरेख सजावट केलेली आहे. यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. एमिसद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या आनंदोत्सवात डीजेंचे पाय थिरकवायला लावणारे संगीत, खास कार्यशाळा, जादूचे प्रयोग आणि केक अशी अखंड रेलचेल असणार आहे. याशिवाय इतरही आकर्षणे उपलब्ध असतील.


ख्रिसमस सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे लिटिल सांतु, तो सांताक्लॉजबरोबर येईल आणि पार्कमधील प्रेक्षकांना सरप्राइज भेटी देणार आहे. रेन डान्सच्या भागात लिटिल सांतुच्या खेळांमध्ये तुम्हाला आनंद लुटता येणार आहे. याशिवाय लिटिल सांतुच्या धमाकेदार कामगिरीचा आनंदही येथील उत्साहात भर घालणार आहे. 


सांताक्लॉजची ख्रिसमस परेड हाही या आनंदोत्सवातले महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. लिटिल सांतु आणि महिला नृत्यांगना सँट्रिना यांचाही यात सहभाग असेल, याबरोबरच 5 एल्व्स आणि रेनडिअर, स्नो क्विन आणि राजकुमार आणि राजकुमारी अशी साऱ्यांचीच उपस्थिती येथे असेल. सुरेख रंगांतील कपडे परिधान करून ते आपल्यासमोर येतील. 


ख्रिसमसच्या आनंदोत्सवात भारतातील नवीन वर्षाच्या सर्वात मोठ्या पूर्वसंध्येचे - बिगनाइट 17 - या डीजे परवीन नायर यांच्या अविरत संगीत एक्स्ट्रानेगान्झाचे आयोजनही करण्यात आले आहे. एस्सेलवर्ल्डमधील ख्रिसमस'द्वारे येथे भेट देणाऱ्या लोकांना, विशेषतः मुलांना सुरेख अनुभव घेता येणार आहे. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.