मुंबई : शहर आणि परिसरात थंडी कामय आहे. हवेत चांगलाच गारठा असल्याने थंडीचा अनुभव मुंबईकर घेत आहे. तसेच धुकेही बऱ्यापैकी आहे. दरम्यान, हवेतील गारठा पुढील आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे थंडी आणखी दोन दिवस अनुभवता येणार आहे.


'ओखी' वादळाचा परिणाम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ओखी' वादळानंतर थंडीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हा 'ओखी' वादळाचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. आणखी पुढील दोन दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज  हवामान विभागाने वर्तविलाय. त्यामुळे मुंबईत थंडी कायम राहणार आहे.


 मुंबईच्या तापमानात घट


शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारी हेच तापमान १५.८ अंश नोंदविण्यात आले होते. पुढील ४८ तास गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविलाय आहे.


वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे थंडीत भर 


वाहणारे गार वारे आणि तापमानात होत असलेली घट, या दोन प्रमुख घटकांमुळे मुंबईतला गारवा कायम आहे. रात्रीसह सकाळी वाहणारे गार वारे थंडीत आणखी भर घालत आहेत. त्यामुळेच शनिवारसह रविवारी किमान तापमान १८ ते २० अंशाच्या आसपास राहील, असे  हवामान विभागाने स्पष्ट केलेय.