मुंबई: एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतून आताची सर्वात मोठी घडामोड समोर येत आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर एनआयएनं छापेमारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसुख हिरेन आणि स्फोटकं प्रकरणी एन्ककाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या रडावर असल्याची माहिती मिळाली आहे. प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी NIA कार्यालयात आणल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून प्रदीर यांच्या घरावर कारवाईला सुरुवात झाली. सकाळपासून एनआयएकडून तपास सुरू आहे. 



प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अँटीलियाबाहेरील स्फोटकं आणि हिरेन प्रकरणात कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 


(बातमी अपडेट होत आहे)