मुंबई : केंद्राच्या एनआयए संदर्भातील पत्र राज्य शासनाकडे आले असून यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवारांनी एसआयटीची मागणी केल्यानंतर हा तपास काढून घेण्यात आला. ज्या लोकांची नावं वगळण्यात आली ते यात अडकतील या भीतीनं केंद्रं सरकारने हा निर्णय घेतला असावा अशी शंका देखील यावेळी त्यांनी उपस्थित केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भीमा कोरेगावच्या बाबतीत केंद्र सरकारने राज्याच्या माध्यमातून सुरू असलेला तपास थांबवून तो केंद्राकडे दिला. तसे पत्र आम्हाला आलेलं आहे पण ते माझ्यापर्यंत आलेलं नाही.पत्र माझ्याकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊ असे देशमुख म्हणाले.



काही पूर्वग्रह मानसिकतेतून काही लोकांना यात गोवण्यातल आलं आणि काही लोकांना वगळण्यात आल्याची शंका आमच्याकडे अनेक संघटनांनी व्यक्त केल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. 



CAA विरोधात अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू आहेत. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक समाजाचे लोक आम्हाला येऊन भेटले. राज्यात एकाही नागरिकाला नागरीकत्व गमवावे लागणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.