मुंबई : पीएनबी घोटाळ्यात आरोपी नीरव मोदीबाबत एक खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरव मोदींच्या 150 एकर जमिनीची माहिती मिळाली आहे. याची किंमत 275 कोटी रुपये आहे. ही जमीन अहमदनगरच्या कर्जत गावात आहे. 150 एकर मध्ये अधिक जमीन ही ओसाड आहे. 


या जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं. ती जमीन नीरव मोदीने विकत घेतली होती. गावात नीरव मोदीच्या नावावर 25 एकर जमीन आहे. हेमंत भट्ट याच्या नावावर 25 एकर तर 100 एकर जमीन फायर ट्रेडिंग कंपनीच्या नावावर आहे. जी पार्टनर शीपमध्ये आहे. याची पृष्टी कर्जतचे तहसीलदार किरण सावंत यांनी केली आहे.


शनिवारी ईडीने नीरव मोदींच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी केली होती. ज्य़ामध्ये अनेक कागदपत्र हाती लागली होती. या कागदपत्रांमध्ये अहमदनगरमधील 150 एकर जमिनीची माहिती मिळाली होती.