मुंबई: आमदार नितेश राणे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक नम्र विनंती आहे. स्टेज मजबूत बांधा रे, साहेबांन सत्तेला लाथ मारली, तर स्टेज सकट कोसळतील, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी शिवाजी पार्कवर शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या मेळाव्यात उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.