`त्या` ट्विटमुळे राणेंच्या भवितव्याची उत्सुकता वाढली
नारायण राणेंच्या दिल्लीवारीनंतर नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमुळे राणेंच्या भवितव्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने होईल? याबद्दलची उत्सुकता वाढलीय.
मुंबई : नारायण राणेंच्या दिल्लीवारीनंतर नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमुळे राणेंच्या भवितव्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने होईल? याबद्दलची उत्सुकता वाढलीय.
आम्हाला राणे साहेबांना विधानसभेत पाहायचं आहे... असं ट्विट नारायण राणे यांच्या दिल्लीवारीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी केलंय. 'राणे राज्यसभेसाठी उत्सुक आहेत... नारायण राणेंची महाराष्ट्राला गरज आहे' असंही त्यांनी म्हटलंय.
नारायण राणेंची महाराष्ट्राला गरज असून राज्यसभेबाबत राणे फार उत्सुक नसल्याचे नितेश यांच्या ट्विटवरुन दिसत आहे.
'राणे साहेबांनी राज्याच्या राजकारणात राहावं, असं सांगण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते राणेंची भेट घेणार असल्याचंही' त्यांनी म्हटलंय.